बिग बॉस मराठी 2: 'किमान थर्ड अंपायर म्हणून तरी प्रेक्षकांना खेळात सहभागी होऊ द्या', पराग कान्हेरे

By  
on  

‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर गेलेला स्पर्धक पराग कान्हेरे सोशल मीडियावर बऱ्यापैकी एॅक्टीव्ह आहे. फेसबूक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पराग बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या घडामोडींवर तो भाष्य करत असतो. नुकत्याच पार पडलेल्या ‘तिकीट टू फिनाले’ या टास्कवर परागने संताप व्यक्त केला. किमान लाजेखातर तरी प्रेक्षकांना या खेळात सहभागी करून घ्या, अशा शब्दांत त्याने बिग बॉसवर ताशेरे ओढले.

बिग बॉसच्या घरात नुकतेच जुने सदस्य पुन्हा आले होते. या सदस्यांना बिग बॉसने कार्य सोपवले होते. त्यामध्ये त्यांच्या दृष्टीने सर्वोत्तम असणाऱ्या दोन सदस्यांची नावे त्यांना बिग बॉसला द्यायची होती. नऊपैकी आठ मते मिळवणाऱ्या पहिल्या स्पर्धकाला फिनालेमध्ये जागा मिळणार होती. घरातील जुन्या सदस्यांनी मतदान केल्यानंतर नेहा शितोळेला आठ मते मिळाली. तर, शिवानी सुर्वेला पाच मते मिळाली. त्यामुळे या दोघीजणी अंतिम फेरीत दाखल झाली असल्याची घोषणा बिग बॉसने केली. याच नॉमिनेशन प्रक्रियेवर परागने आक्षेप घेतला.

 

परागने या संपूर्ण प्रक्रियेवर स्वतःचा तीव्र शब्दात संताप व्यक्त केला, ‘माझा बॉल, माझी बॅट, माझा स्टंप.. किमान थर्ड अंपायर म्हणून तरी प्रेक्षकांना खेळात सहभागी होऊ द्या (लाजेखातर).’ या मूर्खपणात मी सहभागी नसल्याचा मला आनंद आहे, असं त्याने म्हटलं.

‘बिग बॉस मराठी’चा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नेहा आणि शिवानीने फिनालेमध्ये जागा पक्की केल्यानंतर आता या दोघांनंतर आणखी कोण अंतिम फेरीत पोहोचणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chef Parag Kanhere (@paragkanhere) on

Recommended

Loading...
Share