बिग बाॅस मराठी 2: किशोरीताई आणि आरोहवर नाॅमिनेशनची टांगती तलवार

By  
on  

बिग बाॅस मराठी 2 च्या घरात आज वीकएंडचा डाव पार पडणार आहे. या वीकएंडच्या डावात महेश मांजरेकर सर्व सदस्यांची शाळा घेणार आहेत. तसेच बिग बाॅस फिनाले साठी महत्वाचं असलेली नाॅमिनेशन प्रक्रिया आज घरात रंगणार आहे. 

वीणा, आरोह, शिव आणि किशोरीताई या चौघांपैकी कोण घराबाहेर जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. या चौघांपैकी शिव आणि वीणा जास्त मतं मिळाल्यामुळे सेफ झाले आहेत. तर आरोह आणि किशोरीताई हे डेन्जर झोनमध्ये आहेत. 

आता या दोघांपैकी कोण बाहेर जाणार आणि कोणता स्पर्धक फिनालेमध्ये स्वतःचं स्थान निश्चित करणार हे उद्याच्या भागात कळेल.

Recommended

Loading...
Share