बिग बॉस मराठी 2: आज घरातले सदस्य सादर करणार बिचुकलेंवर कार्यक्रम 

By  
on  

बिग बॉस मराठी 2 चा हा शेवटचा आठवडा आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा या रिऍलिटी शोचा महाअंतिम सोहळा येत्या रविवारी रंगणार आहे. त्यामुळे हा आठवडा बिग बॉस मराठीसाठी महत्वाचा असणार आहे. 

आज बिग बॉसमध्ये एक वेगळाच टास्क रंगणार आहे. घरातील सर्व सदस्यांना मिळून बिचुकलेंवर कार्यक्रम सादर करायचा आहे. या टास्कमध्ये आता घरातील सदस्य हा कार्यक्रम कसा सादर करणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. तसेच आज अंतिम आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घरातील सदस्यांनी स्विमिंगपूलमध्ये डुबकी मारून शेवटच्या आठवड्यात गुण्यागोविंदाने राहण्याची प्रतिज्ञा केली. 

आता 'बिग बॉस मराठी 2' चा विजेता कोण ठरणार आणि शेवट्च्या आठवड्यात आणखी कोणते ट्विस्ट अँड टर्न्स येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

Recommended

Loading...
Share