रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा 'वीर सूर्यवंशी'चा हा दमदार फर्स्ट लुक पाहिलात का?

By  
on  

रोहित शेट्टीने मंगळवारी इंस्टाग्रामवर आपला आगामी सिनेमा 'वीर सूर्यवंशी'चा फर्स्ट लुक उलगडला. यात अभिनेता अक्षय कुमार एटीएस चीफ वीर सूर्यवंशीच्या दमदार भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. सूर्यवंशीच्या पोलीस खात्याची ओळख ''कोणताही गणवेश नाही... कोणतंही चिन्ह नाही... दहशतवाद्यांशी दोन हात करणारं असं आहे, आमचं मजबूत पोलिस खातं... सूर्यवंशी'' अशा शब्दांमध्ये रोहित शेट्टीने सूर्यवंशीच्या पोलीस खात्याची ओळख करून दिली आहे.

https://www.instagram.com/p/BxKWM_XhI4n/

या लूकमध्ये एटीएस प्रमुखाच्या भूमिकेत अक्षय कुमारचं व्यक्तिमत्व उठून दिसत आहे. या फोटोमध्ये काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये अक्षय कुमार प्रभावी दिसतोय. या फोटोमुळे अक्षय कुमार वीर सूर्यवंशी सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकण्यास सज्ज झाला आहे.

'मार्वल यूनिवर्स'प्रमाणे रोहित शेट्टी बॉलीवूडमध्ये स्वतःच्या सिनेमांच्या माध्यमातून 'कॉप युनिव्हर्स' बनवत आहे. या कॉप युनिव्हर्सच्या चाहत्यांची संख्या खूप जास्त आहे. २०११ साली आलेल्या सिंघम या सिनेमातून याची सुरुवात झाली असून कॉप युनिव्हर्समधील 'वीर सूर्यवंशी' हा चौथा सिनेमा असणार आहे. अक्षय कुमारची या सिनेमात प्रमुख भूमिका असून अभिनेत्री नीना गुप्ता आणि कतरिना कैफ या सुद्धा या सिनेमात काम करत आहेत.

मागील काही दिवसांमध्ये निर्माता करण जोहरने सिंघम आणि सिम्बा म्हणजेच अजय देवगन आणि रणवीर सिंह यांच्यासोबत सूर्यवंशी अर्थात अक्षय कुमारचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोवरून वीर सूर्यवंशी सिनेमात अजय देवगन आणि रणवीर सिंह हे दोघं पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहरच्या 'धर्मा प्रॉडक्शन' तर्फे होत असून या वर्षीच्या ईद मध्ये म्हणजेच 2019 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे.

Recommended

Loading...
Share