November 08, 2018
‘व्हॅनिला,स्ट्रॉबेरी अॅण्ड चॉकलेट’ १६ नोव्हेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

पसायदानात एक ओळ आहे, ‘भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे’... हे दोन जीवांचे मैत्र... मग ते दोन जीव म्हणजे दोन माणसं असतील किंवा माणूस आणि प्राणी असेल.... वेगवेगळ्या प्राण्यांना घेऊन बॉलीवूड आणि हॉलिवूडमध्ये..... Read More

November 08, 2018
अभिनेत्री तेजस्विनी पंडितची रांगोळी तुम्ही पाहिलीत का?

सध्या दिवाळीचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहतोय. त्यात सेलिब्रिटींची तर बातच न्यारी. प्रत्येक जण नटून-थटून दिवाळी साजरी करतोय. विविध पार्टीजना हजेरी लावतोय. पण आपल्या गुलाबाच्या कळीचं मात्र कलेवरचं प्रेम दिवाळीनिमित्त दिसून..... Read More

November 08, 2018
रितेश देशमुखच्या ‘माऊली’चं लय भारी पहिलं पोस्टर

अभिनेता रितेश देशमुखचा बहुप्रतिक्षित माऊली हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं पहिलंच लय भारी पोस्टर खुद्द रितेश देशमुखनेच लक्ष्मी पूजनाच्या मंगलमयी मुहूर्तावर चाहत्यांसमोर सादर केलं.सर्वांनाच या सिनेमाची..... Read More

November 06, 2018
लय भारी! शाहरुखसाठी रितेश देशमुखने उचललं हे पाऊल

आजकाल हिंदी असो किंवा मराठी प्रत्येक सिनेमाची बॉक्स ऑपिसवर जोरदार स्पर्धा सुरु असते. कधी कधी तर फ्रेक्षकांनासुध्दा प्रश्न पडतो कि कोणता सिनेमा पाहावा. पण नुकताच हा असाच एका सिनेमाबाबतचा पेच..... Read More

November 06, 2018
Video:सिध्दार्थ जाधव आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या हटके स्टाईल दिवाळी शुभेच्छा

आपला मराठमोळा अभिनेता सिध्दार्थ जाधव याची वर्णी रोहित शेट्टी यांच्या बहुचर्चित ‘सिम्बा’ सिनेमात लागलीय हे आपण सर्वच जाणतो. नुकताच सिंबाच्या सेटवर अभिनेता सिध्दार्थ जाधवचा वाढदिवससुध्दा दणक्यात साजरा झाला. दिग्दर्शक रोहित..... Read More

November 06, 2018
पाहा सोनाली कुलकर्णीच्या 'माधुरी' सिनेमाचा ट्रेलर लॉंच!  

उर्मिला मातोंडकर प्रस्तुत, मुंबापुरी प्रॉडक्शन निर्मित, स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या 'माधुरी' या चित्रपटात ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. टीझरपोस्टरमधून 'माधुरी' चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती आणि हीच उत्सुकता लक्षात घेता आता सोनाली कुलकर्णी, शरद केळकर आणि संहिता जोशी यांची प्रमुख भूमिका असलेला 'माधुरी'चा ट्रेलरप्रेक्षकांच्या भेटीस हजर आहे.

   ट्रेलरमध्ये पाहायला मिळते की सोनाली कुलकर्णी एका  तरुणीची भूमिका साकारत असून सध्या तरुण पिढीवर उद्भवणारे अनेक चांगले आणि वाईट प्रसंग आणि त्या प्रसंगांना त्यांनी कसे सामोरे जाऊन त्याचेकशाप्रकारे निरसन करू शकतो ह्याचे प्रदर्शन ट्रेलर मध्ये होत आहे. सोनालीसोबत शरद केळकर, संहिता जोशी, अक्षय केळकर आणि विराजस कुलकर्णी यांनी साकारलेल्या पात्रांची झलक देखील ट्रेलरमध्ये पाहू शकतो.

        या चित्रपटाच्या मार्फत देण्यात येणाऱ्या संदेशाविषयी बोलताना मुंबापुरी प्रॉडक्शनचे मोहसिन अख्तर यांनी म्हटले की, "आयुष्यात परिस्थिती वाईट असली की आपण दुःखी होतो पण याचा अर्थ असा नाही की आपणहसणं विसरतो.  आयुष्यात असे काही phasases येतात पण आपण आयुष्य मात्र जगत राहतो. यावरच आधारीत एक संदेश आम्ही तरुणांना आणि पालकांना देऊ इच्छितो."

           सोनाली कुलकर्णी आणि शरद केळकर यांच्या कामाविषयी मोहसिन यांना नेहमीच विश्वास होता. तसेच नवोदित अभिनेत्री संहिता जोशीची निवड करून तिच्या अभिनयावर विश्वास दाखवून या चित्रपटात संधी दिली. अक्षय केळकर, विराजस, दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी, संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते, गायक-गायिका या सर्वांनी 'माधुरी' साठी मेहनत घेऊन आपापल्या जबाबदाऱ्या योग्यरीत्या पेलल्या, असेही निर्माते मोहसिन यांनी सांगितले.

    मुंबापुरी प्रॉडक्शन आणि मोहसिन अख्तर यांचा पहिला मराठी चित्रपट, सोनाली कुलकर्णीचा हटके लूक, संपूर्ण स्टारकास्टचा तगडा अभिनय या सगळ्या गोष्टीने परिपूर्ण असा 'माधुरी' चित्रपट ३० नोव्हेंबर रोजीप्रदर्शित होत आहे.

..... Read More

November 06, 2018
सचिन पिळगावकर आणि प्रार्थना बेहरे यांच्या 'लव्ह यु जिंदगी'चा उलगडला टिझर

तारुण्य पुन्हा एकदा जगण्याची इच्छा असणाया अनिरुध्द दातेचा म्हणजेच अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या 'लव्ह यु जिंदगी' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच झाला. हा टीझर  प्रेक्षकांच्या भेटीस आल्यामुळे सर्व वयोगटातील प्रेक्षकांना 'लव्ह यु जिंदगी' च्या निमित्ताने दिवाळीची एक अदभुत भेट आणि हटके विषयावर  भाष्य करणारा एक प्रवास अनुभवयाला मिळणार आहे. प्रेम जरी जिंदगी वर असलं तरी त्याची परिभाषा ही दोन्ही वयोगटात कशी वेगळी असते हे टीझरमध्ये दाखवण्यात आले असून सचिन पिळगांवकर, प्रार्थना बेहरे, कविता लाड यांच्या अभिनयाची झलक आणि काही गमतीदार किस्से या टीझरमध्ये पाहायला मिळतात. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने एक नवी जोडी म्हणजेच कविता लाड आणि सचिन पिळगांवकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटाचा टिजर पाहिल्यावर हे लक्षात येते की सचिन पिळगांवकर साकारत असलेले सामान्य गृहस्थ अनिरुद्ध दाते हे पात्र यांचे वयाच्या बाबतीत फारच वेगळे मत आहे. जसे की ते त्यांच्या वाढत्या वयाच्या सत्याला स्विकारण्यास तयार नसून आपण आजही ते तारुण्य अनुभवू शकतो, त्याच उत्साहाने मनमौजी आयुष्य जगू शकतो असे त्यांना वाटते आणि म्हणूनच पुन्हा एकदा तारुण्य जगण्यासाठी त्यांची असलेली धडपड चित्रपटात पाहायला मिळेल. असा हा विनोदी, भावनात्मक आणि रोमांचकारी कथा असलेला चित्रपट अनेकांच्या नक्की पसंतीस उतरेल. दिग्दर्शक आणि सिनेनिर्माते या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत की आयुष्यावर प्रेम करण्यासाठी वयोमर्यादा नसते, त्यासाठी गरजेचं असतं ते उत्साही मन आणि आयुष्य भरभरून जगण्यासाठी लागणारं एक गोड धाडस. एस पी प्रोडक्टशन निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन बायगुडे यांनी केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज सावंत यांनी केली असून कथा देखील त्यांनी लिहिली आहे. कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट येत्या १४ डिसेंबर ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.   https://youtu.be/0CCJj9hM9m8..... Read More