बॉलिवूड ड्रग्सप्रकरणी एनसीबी कार्यालयात दाखल झाली श्रध्दा कपूर

By  
on  

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. त्यापाठोपाठ आता अभिनेत्री श्रध्दा  कपूरसुध्दा एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. 

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं. यात बॉलिवूडचं ड्रग्ज रॅकेट प्रकाशझोतात आलं आणि अनेक मोठमोठ्या कलाकारांची नावं एनसीबीच्या रडारवर आली.

 

 सध्या ड्रग्स प्रकरणामुळे बॉलिवूड पुरतं हादरुन गेलं आहे. अनेक मोठी नाव यात समोर येतायत, प्रामुख्याने यात अनेक प्रसिध्द अभिनेत्रींची नावे आहेत. याप्रकरणी अभिनेत्री राकुल प्रित सिंग  25 सप्टेंबर रोजी एनसीबी कार्यालयात दाखल झाली होती. 

अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, राकुल प्रित सिंग आणि सारा अली खान यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली.

Recommended

Loading...
Share