‘कसोटी जिंदगी...’ फेम अभिनेता सिजेन खानवर अमेरिकन महिलेने लावला फसवणुकीचा आरोप

By  
on  

काही दिवसांपुर्वी अभिनेता सीजेन खान लग्नाच्या चर्चेमुळे प्रकाश झोतात आला. त्याने येत्या काही दिवसातच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं समोर आल आहे. पाकिस्तानी वंशाच्या अमेरिकन महिलेने सिजेन खानवर फसवणुकीचा आरोप आरोप लावला आहे. आएशा पिरानी यांच्या म्हणण्यानुसार 2015 ते 2017 दरम्यान अमेरिकेत तिच्याशी लग्न केलं होतं.

 

ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी सीजेनन तिच्याशी लग्न केलं असल्याचं आएशाचं म्हणणं आहे. याशिवाय तो विवाहित असल्याचंही आपल्यापासून लपवून ठेवलं असल्याचंही आएशाचं म्हणणं आहे. तिने अमेरिकी इमिग्रेशन अधिकारी आणि मुंबई पोलिसांना पत्र लिहून कळवलं आहे. यासोबतच तिने लग्नाचं सर्टिफिकेटही शेअर केलं आहे.  याबाबत सिजेन म्हणतो, ‘ती महिला माझी मोठी फॅन आहे. हे सगळं ती प्रसिद्धीसाठी करते आहे. मी तिच्याशी कधीही लग्न केलं नाही. तिला काही अडचण असेल तर न्यायालयात जावं.

Recommended

Loading...
Share