कर्मचा-यांना 1.25 कोटी रुपये न देणं रामगोपाल वर्मा यांना पडलं महागात

By  
on  

फिल्ममेकर राम गोपाल वर्मायांच्यावर फेडरेशन ऑफ वेस्ट इंडियन सिने एम्प्लॉइज आजीवन प्रतिबंध लावला आहे. या फेडरेशनमध्ये 32 युनियनचा समावेश आहे. वर्मा यांनी कर्मचा-यांना 1.25 कोटी रुपये न दिल्यामुळे हा निर्णय घेतला गेला. 
FWICE ने सांगितलं की त्यांनी यापुर्वी वर्मा यांना अनेक नोटीस पाठवल्या. त्यांना अनेकदा पैसे देण्याबाबत सांगण्यात आलं पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही.

 

 

या फेडरेशनचे सदस्य बीएन तिवारी म्हणतात, ‘ त्यांच्या शुटिंगबाबत समजल्यावर त्यांना या संबंधी पत्रही लिहिलं होतं. गरिब कामगारांना त्यांच्या कष्टाचं मोल मिळावं इतकीच इच्छा होती. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना बॅन करावं लागलं.’

Recommended

Loading...
Share