अभिनेते महेश मांजरेकर यांच्यावर मारहाणीचा आरोप, गुन्हा दाखल

By  
on  

अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर मारहाणीप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. मांजरेकर यांच्या गाडीला आपल्या गाडीचा धक्का लागल्यावर त्यांनी आपल्याला शिविगाळ करुन मारहाण केली, अशी तक्रार कैलास सातपुते या व्यक्तीनं केली आहे. 

काल पुणे-सोलापूर महामार्गावर रात्री ही घटना घडल्याचं समजत आहे. याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आपल्या पुढे गाडी चालवणाऱ्या मांजरेकर यांनी अचानक ब्रेक मारला. त्यामुळे आपली कार त्यांच्या कारला मागून धडकली. त्यानंतर मांजरेकर यांनी ‘तू गाडी पिऊन गाडी चालवतो का’ असं म्हणत मारहाण केली असा आरोप सातपुते यांनी केला आहे.

Recommended

Loading...
Share