वेबसिरीजच्या ऐवजी अश्लील व्हिडियोचं शुट केल्याप्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक

By  
on  

मुंबई क्राईम ब्रांचने अभिनेत्री गहना वशिष्टला अटक केली आहे. आपल्या वेबसाईटवर अश्लील आणि पॉर्नोग्राफिक कंटेट अपलोड केल्याचा आरोप गहनावर आहे. गहनासोबत आणखी सहा लोकांनाही अटक केली आहे. काही दिवसांपुर्वी मुंबई पोलिसांनी ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. 

 

 

यामध्ये दोन तरुणीदेखील सापडल्या आहेत. या तरुणींना अभिनय क्षेत्रात काम देण्याचं आमिष दाखवून अश्लील व्हिडियो बनवण्यासाठी उद्युक्त केलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासात अभिनेत्री गहना वशिष्ठचं नाव समोर आलं. गहना वशिष्ठचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस असल्याचंही समोर आलं आहे. गहना वेब सीरिज, शॉर्ट फिल्मच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करून ते वेबसाईटवर अपलोड करायची, असा तिच्यावर आरोप आहे.

Recommended

Loading...
Share