प्रसिद्ध गायिका सपना चौधरीविरोधात दिल्ली पोलिसात तक्रार दाखल

By  
on  

प्रसिद्ध गायिका सपना चौधरी विरोधात दिल्ली पोलिसांनी आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. सपनाविरोधात जवळपास 4 कोटींचा गुन्हा दाखल झाला आहे. 10 जानेवारीला EOWमध्ये सपनाविरोधात तक्रार दाखल झाली आहे. सपनाने स्टेज शोसाठी सिंगिंग आणि डान्सिंग अ‍ॅग्रीमेंट केलं आहे.

 

 

पण परफॉर्मन्ससाठी मोठी रक्कम घेऊनही तिने परफॉर्म केलं नाही. याशिवाय ती रक्कमही परत केली नाही. कंपनीने सपनाची आई, भाऊ- भावजय आणि बहीणीवर गुन्हा दाखल केला आहे. तिच्याविरोधात नऊ पानांचं मोठं आरोपपत्र दाखल केलं आहे. आयपीसी कलम 420, 120 आणि 406 अंतर्गत सपनावर आरोप दाखल केला गेला आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखा लवकरच नोटीस पाठवून सपनाला चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे.

Recommended

Loading...
Share