मनी लॉण्डरिंग प्रकरणात रणबीर कपूरचा भाऊ अरमान जैनला ED कडून समन?

By  
on  

कपूर कुटुंबाच्या अडचणींमध्ये वाढच होताना दिसत आहे. या कुटुंबातील सदस्यावर आता EDची नजर पडली आहे. रणबीर कपूरचा आत्येभाऊ अरमान जैनला EDने नोटीस बजावली आहे. अरमान ऋषी कपूर यांची बहीण रीमा जैन यांचा मुलगा आहे. 
EDने मनी लॉण्डरिंग प्रकरणात अरमानला नोटीस पाठवली आहे.

 

एका प्रकरणात अरमानच्या संबंधाची लिंक मिळाल्यानंतर EDने अरमानला नोटीस पाठावली आहे. राजीव कपूर यांच्या निधनापुर्वी काहीच तास आधी अरमानच्या घरी छापा मारला आहे. पण या दरम्यान रिमा जैन यांना राजीव यांच्या घरी जाण्याची खास परवानगी देण्यात आली. वैयक्तिक फर्मशी जोडलेल्या मनी लॉण्डरिंग प्रकरणात संशयाची सुई अरमान जैनकडे वळली आहे. या प्रकरणात यापुर्वी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांचीही चौकशी झाली आहे.

Recommended

Loading...
Share