By  
on  

श्रेयस तळपदे या खास सदस्यासोबत साजरा करणार ख्रिसमस, पाहा कोण आहे तो सदस्य

श्रेयस तळपदे अलीकडेच चर्चेत आला होता त्याच्या मुलीमुळे. श्रेयस आणि त्याची बायको दिप्ती अलीकडेच सरोगसी पद्धतीने आई-बाबा झाले. त्यांच्या मुलीचा ‘आद्या’चा हा पहिलाच ख्रिसमस असल्याने तो खुपच खुशीत आहे.

 

 

‘यावेळी श्रेयस म्हणतो, ‘मला ख्रिसमस खुप आवडतो. पण हा ख्रिसमस माझ्यासाठी खुपच स्पेशल आहे. कारण आद्याचा हा पहिलाच ख्रिसमस आहे. तिचं आमच्यासोबत असणं ही आनंददायी बाब आहे. आद्याला दिव्यांची आरास खुप आवडते. त्यामुळे मी तिच्यासाठी शुटिंग संपल्या संपल्या ख्रिसमस ट्री बनवणार आहे’.

यापुढे तो म्हणतो, ‘ हे वर्ष बघता बघता सुरु होऊन संपतही आलं. या वर्षात ब-याच चांगल्या घटना घडल्या आहेत. हे वर्ष माझ्यासाठी आणि दिप्तीसाठी चांगली आठवण म्हणून लक्षात राहील. याशिवाय माझ्या लग्नाचा वाढदिवसही याच दरम्यान येत असल्याने ख्रिसमस माझ्यासाठी खुपच स्पेशल असतो.

श्रेयस सध्या त्याच्या ‘माय नेम इज लखन’ या मालिकेच्या शुटिंगमध्ये गुंतला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive