By  
on  

सोनाली कुलकर्णीने असं दाखवलं धाडस, पाहा तरी तिने काय केलं...

आयुष्यात काहीतरी थ्रिलींग करावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. सोनाली कुलकर्णीलाही असच काहीतरी वाटत होतं. आपल्यातील धाडस आजमावायला तिने निवडलं दुबई. सोनालीने दुबईला गेल्यानंतर स्काय डायव्हिंगचा थरार अनुभवला.

[video width="640" height="360" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2018/12/sonalee18588_48660356_2267662413518234_1242920663098851328_n.mp4"][/video]

या रोमांचकारी अनुभवाबद्द्ल सोनाली लिहिते, खरं तर मी याआधी ऑस्ट्रेलियात स्काय डायव्हिंग केलं असल्याने या रोमांचचा अनुभव पाठीशी होताच पण दुबईच्या विस्तीर्ण वाळवंटात स्काय डायव्हिंगचा थरार अनुभवण्याची मजाच काही वेगळी होती.

[video width="640" height="360" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2018/12/sonalee18588_49187499_2282967081938816_3684280752473636864_n.mp4"][/video]

हा अनुभव श्वास रोखून धरायला लावणारा होता. विशेष म्हणजे विमानतून हवेत झेपावल्यानंतर मला जराही भिती वाटली नाही. उलट हवेतील तरंगण्याचं स्वातंत्र्य काय असतं हे अनुभवता आलं. हवेत झेपावतन हनुवटी आणि डोक वरच्या बाजूला ठेवून मोकळ्या हवेला सामोरं जायची मजाच वेगळी असते.

Recommended

PeepingMoon Exclusive