PeepingMoon2018: या आहेत २०१८ मधील मराठी ‘ग्लॅम गर्ल्स’, फॅशन सेन्सने चाहत्यांना केलं चकित

By  
on  

ग्लॅमरस आणि प्रेझेंटबल दिसणं आजकाल प्रत्येक क्षेत्राची गरज आहे. अभिनयाचं क्षेत्र त्यात आघाडीवर आहे. मराठी अभिनेत्रीही ग्लॅमरस दिसण्यात अजिबात मागे नाहीत. ट्रॅडिशन असो किंवा वेस्टर्न या अभिनेत्री प्रत्येक स्टाईल अगदी आत्मविश्वासाने कॅरी करतात. २०१८मध्येही काही अभिनेत्रींनी आपल्या लूकने सगळ्यांना वेड लावलं पाहुया कोण आहेत या ग्लॅम गर्ल्स

• सई ताम्हणकर

सईने २०१८मध्ये स्वत:त सकारात्मक बदल केले. योग्य वर्कआउटच्या मदतीने सईची फिगरही अधिक आकर्षक बनली आहे. याशिवाय सई फॅशनबाबतीत जास्त प्रयोगशील असल्याने या यादीत ती क्रमांक एकवर विराजमान आहे.

 

 

• अमृता खानविलकर

मराठी सिनेसृष्टीची ग्लॅमरस डान्सिंग डॉल असं जिच्याबाबत म्हणता येईल ती म्हणजे अमृता खानविलकर. अमृताचा स्टाईला सेन्स उत्तम आहेच याशिवाय वेगवेगळी स्टाईल कॅरी करण्याचा आत्मविश्वासही असल्याने तिची स्टाईल गर्दीत उठून दिसते.

• प्रिया बापट

लोभस चेहरा लाभलेली ही नायिका स्टायलिंगच्या बाबतीतही वरचढ आहे. प्रिया पैठणीमध्ये जितकी सुंदर दिसते तितकीच गाऊनमध्ये ग्लॅमरस दिसते. सोशल मिडियातील तिच्या लूक्सवर लाईक्सचा वर्षाव होत असतो.

• सोनाली कुलकर्णी

सौंदर्य आणि स्टायलिंग या दोहोंचा मेळ साधायचं कसब ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीला साधलं आहे. सोनालीची क्रिएटिव्ह स्टाईल तिला मराठीमधील ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीत नेऊन ठेवते.

 

 

Recommended

Share