By  
on  

मयुर मोरेची ‘लकी’नंतर थेट ‘कोटा फॅक्टरी’ मध्ये लागली वर्णी

‘लकी’ सिनेमात लकीच्या लव्हगुरुचा रोल करणारा अभिनेता मयुर मोरे सध्या ‘कोटा फॅक्टरी’ वेबसिरीजमधून रसिकांच्या भेटीला येत आहे. द व्हायरल फीवर (टीव्हीएफ)वर ही सीरिज पहायला मिळणार आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांना सीईटीसाठी क्लासेस असलेल्या कोटा या शहरातील काही विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर ही सिरीज बेतलेली आहे.

https://www.instagram.com/p/Bvy6DYDHjdw/?utm_source=ig_web_copy_link

या सिरीजमध्ये  जितेंद्र कुमार (जीतू), अहसान चन्ना (शिवानी), रेवती पिल्लई (वर्तिका), आलम खान (उदय) आणि रंजन राज (मीना) यांच्याही भूमिका आहेत. मयुर यात वैभव पांडे नावाच्या विद्यार्थ्याच्या भूमिकेत आहे. आयआयटीमध्ये पास होण्याची स्वप्नं पाहणारा वैभव कोटामध्ये येतो. त्यापुढे त्याचं आयुष्य कसं वळण घेत जातं हे पाहणं रंजक ठरेल. या सिनेमाचं दिग्दर्शन राघव सुब्बू यांनी केलं आहे.

https://www.instagram.com/p/BwFMxlonwzP/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive