By  
on  

साखरपुड्याच्या चर्चांबद्दल अभिनेत्री नेहा पेंडसेने पहिल्यांदाच सोडलं मौन

नेहा पेंडसे हे नाव मराठी रसिकांसाठी नवीन नाही. नेहाने अलीकडेच सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमुळे तिचा साखरपुडा झालाय कि काय अशी चर्चाही फॅन्समध्ये सुरु होती. नेहाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती मध्यभागी असून छान लाजताना पाहायला मिळाली तर सोबतच तिची गॅंग म्हणजेच अभिजीत खांडकेकर, श्रृती मराठे, हेमांगी कवी आणि इशा दांडे या सर्व मराठी सेलिब्रिटींचा छान ग्रुप फोटो पाहायला मिळतोय. अभिजीतनेसुध्दा हा फोटो पोस्ट करत, अभिनंदन असं म्हटलं होतं. यामुळे नेहाकडे काहीतरी चांगली बातमी असल्याचा कयास प्रत्येकानेच लावला होता.

https://www.instagram.com/p/Bwvn9LbF6kU/?utm_source=ig_web_copy_link

पण नेहाने या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. ती म्हणते, ‘माझ्या साखरपुड्याची बातमी अफवा आहे. त्यात काहीच तथ्थ्य नाही. मला सध्या तरी लग्नाची घाई नाही. मी सध्या सगळं लक्ष करीअरवर केंद्रित केलं आहे. कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एका प्रोजेक्टवर काम सुरु आहे.’ एकुण काय नेहा सध्या तरी सिंगल असल्याचं या विधानावरून स्पष्ट झालं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive