By  
on  

'बिग बॉस मराठी २' मध्ये सहभागी होणार हे स्पर्धक?

'बिग बॉस मराठी २' ची सध्या सगळीकडे जोरात चर्चा सुरु आहे. वाहिनीवर दाखवण्यात येणाऱ्या प्रोमोज मधून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिग बॉसच्या नवीन सीजन मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याबाबतीत सर्वांना कुतूहल आहे. कलर्स मराठी वाहिनीने या सीजनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची संभाव्य यादी समोर आणली आहे.

एका आघाडीच्या वृत्तवाहिनेने या सीजनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची संभाव्य यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार या सीजनमध्ये अभिनेत्री मनवा नाईक, कवी मनाचे नेते प्रसिद्ध असलेले अभिजीत बिचुकले, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अभिनेता मिलिंद शिंदे, अभिनेता दिगंबर नाईक, अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, अभिनेत्री नेहा पेंडसे, टिकटॉक गर्ल अमृता देशमुख हे स्पर्धक सहभागी होणार आहेत. तसेच अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगांवकर, अभिनेत्री नेहा शितोळे तसेच एका महिला कीर्तनकाराचा सुद्धा या सीजनमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

https://twitter.com/BiggBossMarathi/status/1125012087296495617

सूत्रांच्या माहितीनुसार १४ मे रोजी या सर्व स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात नेण्यात येणार असून १७ मे पासून शूटिंगला सुरुवात होणार आहे. १९ मे ला ‘बिग बॉस मराठी २’चा पहिला एपिसोड कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होईल.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive