अभिनेता अनिकेत विश्वासरावविरोधात पत्नीची कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याची तक्रार

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेता अनिकेत विश्वासरावविरोधात आणि त्याच्या आई-वडिलांविरोधात पत्नी स्नेहा विश्वासरावने घरगुती हिंसाचार आणि मारहाणी तक्रार केली आहे. याप्रकरणी पुण्ययातील अलंकार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे.

पत्नी अभिनेत्री स्नेहाने सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण करु नये यासाठी अनिकेत सतत प्रयत्नशील असायचा, नातेवाईकांसमोर तिला सतत अपमानास्पद वागणूक द्यायचा. तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला असे स्नेहाने आप्लया तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणात पती अनिकेत विश्वासराव याला सासरे चंद्रकांत आणि सासू अदिती यांनी साथ देण्याचे काम केले आहे.


अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाण यांनी डिसेंबर २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली होती. 

Recommended

Loading...
Share