By  
on  

‘मिस यु मिस्टर’ हा आजच्या जनरेशनचा सिनेमा : सिद्धार्थ चांदेकर

कोणतंही नातं स्थळ, काळ आणि अंतराच्या परीघा पलिकडचं असतं असं म्हणतात. पण अनेकदा इच्छा नसूनही नात्यात अंतर आणावं लागतं. अलीकडे अनेक जोडपी ‘डिस्टन्स रिलेशनशीप’चा पर्याय निवडतात. पण त्यांचं नातं अंतर, विरह, समज आणि गैरसमजाच्या जंजाळातून कितपत वाचतं हे ‘मिस यू मिस्टर’ मध्ये पहायला मिळेल. या सिनेमातून मृण्मयी देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर ही जोडी पुन्हा एकत्र येत आहे. ही जोडी पहिल्यांदा आपल्याला अग्निहोत्र मालिकेत दिसली होती. त्यावेळी त्यांची केमिस्ट्रीला रसिकांनी पसंती दर्शवली होती. आता ही जोडी ‘मिस यु मिस्टर’ सिनेमातून रसिकांच्या भेटीला आली आहे.

आजकाल अनेकजण उज्ज्वल भविष्यासाठी परदेशी जाण्याचा पर्याय निवडतात. पण यावेळी खरी अडचण होते मागे राहिलेल्यांची. पती-पत्नीपैकी एकजण जरी काही कारणास्तव परदेशात असले तर त्यातील दुसरा विरहाचे सुर आळवत असतो. अशा वेळी नातं कितीही धीराने घ्यायचं ठरवलं तरी काही कटू प्रसंग येतातचं अशा नात्याचा समतोल कसा साधावा हे या सिनेमात दिसेल. सिद्धार्थ या सिनेमात वरुण तर मृण्मयी कावेरीच्या भूमिकेत आहे. अंतर कितीही असलं तरी नात्यातले बंध कसे जपावे हे या सिनेमात दिसून येतं. ‘वाढलेल्या अंतरातून फुलणार प्रेम!’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. कावेरी आणि वरुणची केमिस्ट्री या टॅगलाईनला पुरेपूर न्याय देते.

सिनेमातील आपल्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना अभिनेता सिद्धार्थ चांदेकर म्हणतो,

या सिनेमात मी ‘वरूण देवल’ ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. अत्यंत हसरा, मजेशीर, कुटुंबाला प्राधान्य देणारा, प्रत्येक पार्टीची जान असणारा असा हा वरुण आहे. या पात्रात सच्चेपणा येण्यासाठी मी फारशी तयारी न करता सेटवर जात होतो. कारण व्यक्तिरेहखेची फार तयारी करत बसलो असतो तर त्यात सहजता आली नसती. विशेष म्हणजे मृण्मयीबरोबर काम करताना खूप मजा आली. आम्ही खुप पुर्वीपासून एकमेकांना ओळखतो त्यामुळे सेटवर खुप खेळीमेळीचं वातावरण होतं.

या सिनेमाच्या अनुभवाबद्दल मृण्मयी सांगते, ‘हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत चांगला होता. सिद्धार्थला मी लहानपणापासून ओळखते. त्यामुळे आमची मैत्री टायटॅनिकमधील लिओनार्दो आणि केट सारखी आहे. सिद्धार्थमध्ये अभिनेता म्हणून खुपच सकारात्मक बदल झाला आहे. या सिनेमात मी कावेरीची व्यक्तिरेखा साकारत आहे. कावेरी आजच्या काळातील मुलगी आहे. स्मार्ट आहे. लग्नानंतर काहीच दिवसात नव-याला करीअरसाठी परदेशात जावं लागतंय हे समजून घेणारी मुलगी आहे. सासू-सास-यांसोबत रहात असताना नव-यालाही ती खुप मिस करत आहे. या आठवणीमधून होणारा भावनिक असमतोल ती कसा सांभाळते हे या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळेल.’

संदीप भार्गव आणि मनीष हांडा यांनी सह-निर्मिती केली आहे. थ्री आय क्रिएटिव्ह फिल्म्सच्या सहकार्याने मंत्रा व्हिजन या कंपनीने ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive