By  
on  

वूट्च्या अनसीन अनदेखामध्ये पाहा सुरेखाताईंच्या संघर्षाची कथा

महाराष्‍ट्राची लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी वर्षानुवर्षे क्षेत्रामध्‍ये आपले नावलौकिक केले आहे. त्‍यांनी प्रख्‍यात व लोकप्रिय लावणी नर्तिका बनण्‍यासाठी जीवनात अनेक संघर्ष व चढ-उतारांचा सामना केला आहे. 
वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये सुरेखा ताई आपल्‍या संघर्षांबाबत बोलताना आणि लावणीमुळे त्‍यांच्‍या कुटुंबाच्‍या उदरनिर्वाहासाठी कशाप्रकारे मदत झाली याबाबतच्‍या काही रोचक गोष्‍टी सांगताना दिसत आहेत. 

सुरेखा ताई त्‍यांच्‍या सुरूवातीच्‍या दिवसांची आठवण काढत म्‍हणतात, ''२००३ पर्यंत पूर्ण महाराष्‍ट्रात माझ्या शोचे बोर्ड लागायचे. मला खूप साथ दिली लावणीने, २ महिन्‍यांचे दौरे लागायचे माझे आणि एक दौरा झाला की एक जमिन विकत घ्‍यायची मी. १९८९ पासून माझा सफर सुरू झाला, रोजचे ३-४ शोज करायचे.'' 
दिगंबर व बाप्‍पा त्‍यांची जीवनगाथा ऐकून भारावून गेले. त्‍या पुढे म्‍हणाल्‍या, ''२००३ नंतर मी थांबले आणि ब्रेक घेतला ३ वर्षांचा आणि २००६ परत सुरू केला लावणीचा सफर.''  
काहीशा विचारमग्‍न झालेल्‍या सुरेखा पुढे म्‍हणतात, ''५ बहिणी आहोत आम्‍ही, चौघींना घर, जमिन घेऊन दिली त्‍यांच्‍या मुलांची लग्‍न केली. भावाला दुकान, घर, जमिन घेऊन दिली, लग्‍न केलं त्‍याचं. सगळं केलं लावणीच्‍या मदतीने.'' 
खरंच प्रेरणादायी ना? आम्‍ही आशा करतो की, सुरेखा पुणेकर यांची ही जीवनगाथा प्रत्‍येकाला प्रेरित करेल.

Recommended

PeepingMoon Exclusive