सुबोध भावे -गायत्री दातारने मानले रसिकांचे आभार, पाहा काय म्हणतात ते

By  
on  

‘प्रेमाला वय नसतं’ या विधानाचा आधार घेऊन ‘तुला पाहते रे’ या मालिकेने रसिकांच्या मनात खास स्थान मिळवलं. यशस्वी उद्योजक विक्रांत सरंजामे आणि सर्वसामान्य मुलगी इशा निमकर यांच्यातील प्रेम रसिकांना भावलं. विशेष म्हणजे विक्रांत आणि इशा यांच्या वयात जवळपास निम्म्याहून जास्त अंतर असूनही ही आगळी वेगळी मालिका लोकप्रिय ठरली. गेल्या जुलैमध्ये सुरु झालेल्या मालिकेत आता काहीसं वेगळं वळण आलं आहे. या मालिकेच्या यशानिमित्त विक्रांत आणि इशा म्हणजेच सुबोध आणि गायत्रीने फेसबूक लाईव्ह वरून रसिकांचे आभार मानले आहेत. या मेसेजमध्ये सुबोधने रसिकांनी भरभरून प्रेम दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे. यावेळी सुबोधने मालिकेबद्दलचा एक खुलासाही केला आहे. ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं सांगितलं. येत्या काही दिवसातचं मालिकेच्या शुटिंगचं शेड्युलही संपत असल्याचं त्याने नमूद केलं. यावेळी सुबोधने इशा म्हणजेच गायत्री दातारची कौतुक केलं. गायत्रीचा अभिनय दिवसेंदिवस उत्तम होत चालला असल्याचं त्याने सांगितलं. यावेळी गायत्रीनेही तिच्या शुटिंगचा पहिला अनुभव शेअर केला आहे. सुबोधमुळे तिचा सेटवरचा पहिला दिवस चांगला गेला असं तिने सांगितलं. या दोघांनीही रसिकांचे आभार मानले असले तरी रसिक मात्र यांना नक्कीच मिस करतील यात शंका नाही.

 

Recommended

Loading...
Share