By  
on  

अबब! सई ताम्हणकरने उचललं सोनाली कुलकर्णीला, पाहा व्हिडिओ

मराठी सिनेसृष्टीमधील दोन आघाडीच्या अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर. एकाच इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असल्याने दोन अभिनेत्रींमध्ये स्पर्धा असणं काही नवीन नाही. परंतु सई आणि सोनाली मात्र याला अपवाद आहे. 

सई आणि सोनाली प्रत्यक्ष आयुष्यात खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या अनेकवेळा परस्परांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. यावरून त्यांच्यातली मैत्री किती घनिष्ट आहे हे दिसून येतं. 

नुकतंच सई ताम्हणकरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. या व्हिडिओत सईसोबत सोनली कुलकर्णी सुद्धा दिसून येत आहे. या व्हिडिओत सई सोनालीला चक्क उचलताना दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Having some fun with my pact buddy @sonalee18588 . #bts #pactbuddy #sonabai #chiutai #forthepact #friendshipgoals

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

 

'मी माझ्या जिवलग मैत्रिणीसोबत मजा करत आहे' असं कॅप्शन सईने या व्हिडिओला दिलं आहे. एकुणच या दोन अभिनेत्री एकमेकांसोबत धमाल करताना दिसत आहेत. 

सई आणि सोनाली यांनी यापूर्वी 'क्लासमेट', 'झपाटलेला २', 'हाय काय नाय काय' यांसारख्या सिनेमांमध्ये एकत्र झळकल्या आहेत. लवकरच या दोघी समीर समीर विद्वांस दिग्दर्शित 'धुराळा' या सिनेमातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमात अमेय वाघ, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, प्रसाद ओक आदी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

उडवून टाकू च्यामायला... धुराळा!!! #next#film#work#happiness#life

A post shared by Sameer Vidwans (@sameervidwans) on

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive