मराठी सिनेसृष्टीत वाजणार का सनई चौघडे, वाचा सविस्तर

By  
on  

अलीकडे मराठी सिनेसृष्टीत लग्नाचा सीझन आहे. अनेक कलाकार आपल्या जीवलगासोबत एकत्र राहाण्याचं वचन घेत आहेत. यावेळी जे अजून अविवाहित आहेत अशा कलाकारांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलेलं दिसतं. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही याला अपवाद नाही. महाराष्ट्राची लाडकी अप्सरा कधी बोहल्यावर चढणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहेच.

 

एका लिडिंग इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सोनालीने नुकताच या बाबीचा खुलासा केला आहे. यावेळी सोनालीने रिलेशनशीपमध्ये असल्याचंही स्पष्ट केलं आहे. सोनाली म्हणते, ‘योग्य वेळ आली की मी त्या व्यक्तीला तुमच्यासमोर आणेनच. जे काही होईल ते रितसर होईल.’ एकंदरीत सोनालीने तिचा लाईफ पार्टनर निवडला आहे हे नक्की. पण सोनालीचा पार्टनर सिनेसृष्टीतील नसल्याचं तिने सांगितलं आहे.

एकुण काय सोनालीच्या फॅन्सना लवकरच तिला वधुवेषात पाहायला मिळेल यात शंका नाही. सोनाली अलीकडे ‘ती आणि ती’ सिनेमात दिसली होती.

पुढील वर्षीमात्र तिचे ३ सिनेमे रिलीज होत आहेत. सोनालीने अलीकडेच पोलिस वेषातील फोटो शेअर केला होता. यावरून सोनालीचा आगामी सिनेमा पोलिसपट असेल की काय अशी विचारणा चाहत्यांकडून केली जात होती.

Recommended

Loading...
Share