By  
on  

'बाहुबली'च्या साम्राज्यात मराठमोळी अभिनेत्री सोनाली खरे

'बाहुबली: द बिगनिंग' आणि 'बाहुबली: द कन्क्लुजन' या दोन सिनेमांनी प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता मिळाली. आता या सिनेमांवर आधारित वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून अनेक मराठी कलाकार या वेबसिरीजमध्ये झळकणार आहेत. यापैकी एक नाव नुकतंच समोर आलं आहे. 

अभिनेत्री सोनाली खरेने नुकतंच आपल्या इंस्टाग्रामवरून या विषयी पोस्ट टाकून या वेबसिरीजमध्ये सोनाली एका भारतीय स्त्रीची व्यक्तिरेखा साकारत आहे.

 

''अशी भूमिका साकारत असल्यामुळे मी खूप खुश आहे. एक अशा प्रकारचा पारंपरिक लुक असल्याची व्यक्तिरेखा साकारायला मिळणं आणि एका मोठ्या प्रोजेक्ट्चा भाग होणं ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे.'' असं मत सोनालीने व्यक्त केलं. 

बाहुबलीची सुरुवात आणि त्याआधी काय घडलं हे दुसऱ्या भागात पाहायला मिळालं. मात्र या सीरिजमध्ये माहिष्मती साम्राज्यात याआधी काय घडलं हे दाखवण्यात येणार आहे. या सीरिजसाठी हैद्राबादला मोठा सेट उभारण्यात आला आहे. 

 

राजामौली हे या सीरिजचं दिग्दर्शन करणार आहेत. ही सिरीज लवकरच प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive