असं काय झालं की सिद्धार्थ जाधवने मागितली जेनेलिया वहिनींची माफी

By  
on  

अभिनेता सिद्धार्थ जाधव हा सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्हअसतो. त्याचे फोटो आणि त्याच्या पोस्ट्स हे नेहमी चर्चेच्या विषय असतात. 

नुकतीच अभिनेता रितेश देशमुखने ट्विटरवर आपल्या दोन मुलांसोबत फोटो पोस्ट केला आहे. यात रितेश पाठमोरा उभा असून त्याचे दोन्ही हात पकडून त्याची मुलं उभी आहेत. या फोटोत आकाशात पावसाची चिन्ह दिसत असून रितेश गार्डनमध्ये उभा आपल्या दोन्ही मुलांना हाताशी धरून उभा आहे. हा सुंदर फोटो रितेशची बायको आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुखने क्लीक केला आहे. 

 

या सुंदर फोटोवर अभिनेता सिद्धार्थ जाधवने ‘सर सुपर..’  अशी कमेंट केली. सिद्धार्थ जाधवने कमेंट करताक्षणी ‘सर सुपर आणि जिने फोटो काढलाय तिच्याबद्दल काही नाही?,’ असं ट्विट जेनेलियाने केलं. जेनेलियावहिनींनी अशी कमेंट करताक्षणी सिद्धार्थने  ‘सर सुपर वुमन आहेत जेनेलिया मॅम. आऊटस्टँडिंग फोटो काढलाय असं लिहायचं होतं. टायपिंग मिस्टेक.. सुपर क्लिक!’ अशी सारवासारव करत आपली बाजू सांभाळायचा प्रयत्न केला. 

 

सिद्धार्थने केलेल्या या कमेंट वर पुन्हा जेनेलियाने ‘तुम्ही रिअल लाइफमध्ये पण रिव्हर्स किंग आहात.. जमलंय बघा,’ अशा मिश्किल शब्दात सिद्धार्थचं कौतुक केलं. त्यावर 'वहिनीसाहेब' म्हणत सिद्धार्थने जेनेलियासमोर हात जोडले. 

 

या दोघांचं हे संभाषण वाचून नेटकऱ्यांना गम्मत वाटली. त्यांनी सिद्धार्थच्या हजारजबाबीपणाचं आणि जेनेलियाच्या मराठी बोलण्याचं कौतुक केलं. 

Recommended

Loading...
Share