अमोल कोल्हे यांची खासदारकीची इनिंग सुरु, पहिल्या भाषणात केली ही मागणी

By  
on  

अभिनयातून राजकारणाकडे वळलेले डॉ. अमोल कोल्हे यांची खासदारकीची इनिंग सुरु झाली आहे. स्वराज्याची राजधानी रायगडला राजधानीचा दर्जा देण्यासंबंधी अमोल यांनी नुकताच संसदेत प्रस्ताव मांडला. ते म्हणतात, ‘‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ प्रमाणेच रायगडचाही विचार व्हायला हवा.

रायगडची जपणूक करून राजधानीचा दर्जा दिल्यास जगातील आठवं आश्चर्य ठरेल.’ अमोल यांनी यापुर्वी शिवाजी महाराज आणि आता संभाजी महाराज यांची व्यक्तिरेखा साकारून प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवलं आहे. सध्या ते ‘स्वराज्यरक्षक संभाजी महाराज’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील त्यांच्या अभिनयाची प्रत्येकावर छाप पडली आहे. अमोल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिरुर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यात ते उत्तम मताधिक्याने विजयीही झाले होते. अमोल यांनी त्याचं पहिलंच भाषण संसदेत सादर केलं.

Recommended

Loading...
Share