By  
on  

सुबोध भावेला मिळाली आगळी वेगळी कौतुकाची थाप

कोणत्याही कलाकारासाठी मानधनापेक्षा महत्त्वाची असते ती कौतुकाची थाप. मनापासून केलेल्या कौतुकाने कलाकारालाही काम करण्याची आणखी प्रेरणा मिळते. अभिनेता सुबोध भावेचंही असंच काहीसं झालं आहे. सुबोध एक उत्तम कलाकार आहे. सुबोधच्या अनेक उत्तम सिनेमांपैकी ‘काशीनाथ घाणेकर’ हा सिनेमा उत्तम आहे. सुबोधच्या नुतन मराठी विद्यामंदिर शाळेतील शिक्षकांनी त्याचा हा सिनेमा पाहिला आणि त्याला शुभेच्छापत्र पाठवलं.

 

सुबोध भावे यांचे शिक्षक शशिदा इनामदार यांनी हे पत्र पाठवलं आहे. सुबोधन हे पत्र ज्यांनी शाळेत आपल्याला शिकवलं,भाषेचे संस्कार केले,अशा आपल्या गुरुजींनी दिलेली ही कौतुकाची थाप आयुष्यभर पुरणारी आहे. मनपूर्वक धन्यवाद सर’’ या कॅप्शनसह शेअर केलं आहे. या पत्रात सुबोधने काशिनाथ घाणेकर उत्तम साकारल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे. याशिवाय त्याचा प्रवासही उलगडला आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर हे आज असते तर त्यांनी या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचे कौतुक करत आपल्यावर कौतुकांचा वर्षाव केला असता, असं म्हणत इनामदार सरांनी सुबोधचं कौतुक केलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive