स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकरची ही स्टंटबाजी पाहून तुम्हालाही येईल हसू

By  
on  

सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत असलेला ट्रेंड म्हणजे #BottleCapChallenge. अनेक कलाकारही या चॅलेंजच्या निमित्ताने स्वत:चा फिटनेस आजमावत आहेत. यामध्ये आपल्या उंचीला समांतर अशी एक काचेची बाटली समोर ठेवली जाते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Repost @sidchandekar (@get_repost) ・・・ Sorry @swwapnil_joshi #bottlecapchallenge #viral #trending

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi) on

 

त्यानंतर गोल फिरून पायाने त्या बाटलीचं झाकण उडवण्याचा प्रयत्न केला जातो. पण या सगळ्या कृतीमध्ये असं करताना ती बाटली खाली पडली नाही पाहिजे अशी अट असते. अलीकडेच हॉलिवूड आणि हिंदी कलाकारांनी हे चॅलेंज पूर्ण करतानाचे व्हिडियोही शेअर केले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Why should boys have all the fun ? #bottlecapchallenge #kavya #way #mypaluisstrongerthanyourkick #sorryjasondada

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

जीवलगाच्या सेटवरही स्वप्नील आणि अमृताने हटके पद्धतीने चॅलेंज पूर्ण केलं आहे. त्यांचे हे व्हिडियो पाहूँ तुम्हालाही हसू आल्याशिवाय रहात नाही. या व्हिडियोमध्ये स्वप्नील हे चॅलेंज पूर्ण करण्याच्या तयारीत असतो तोच सिद्धार्थ चांदेकर त्याची बॉटल उचलून त्यातील पाणी पितो. तर दुसरीकडे स्टायलिश अमृता साडीच्या पदरानेच हे चॅलेंज पूर्ण करताना दिसते. या कलाकाराचे हे अतरंगी व्हिडियोज तुम्हीही एकदा पाहाच.

Recommended

Loading...
Share