बिग बॉस मराठी2: पराग कान्हेरेने दिला घरातील या सदस्याला पाठींबा, व्होट करण्याचं केलं आवाहन

By  
on  

पराग कान्हेरे हा आता बिग बॉसच्या घरातील स्पर्धक नसला तरी घरातील काही व्यक्तीशी त्याची खास अ‍ॅटॅचमेंट आहे. पराग घरात असताना त्याची रुपाली भोसले आणि किशोरी शहाणे यांच्याशी खास मैत्री होती. याच मैत्रीला जागत परागने किशोरी ताईंसाठी व्होट करण्याची चाहत्यांना अपील केलं आहे.

 

खरं पाहता परागची रुपालीसोबत खास अ‍ॅटॅचमेंट झाली होती. त्यामुळे ही अपील रुपालीसाठी असेल असादेखील चाहत्यांचा कयास होता. पण परागने या व्हिडियोमध्ये किशोरीताई घरात सगळ्यात जवळ असून त्या आता एकट्या पडल्या असल्याचं बोलून दाखवलं आहे.

यासोबतच त्यांना व्होट करण्याचं आवाहनाही केलं आहे. आता चाहते परागच्या आवाहनाला कितपत प्रतिसाद देतात हे ‘वीकेंड का वार’मध्ये समजून येईलच.

Recommended

Loading...
Share