मराठी कलाकारांनाही सोशल मिडियावर शेअर केला बॉटल कॅप चॅलेंजचा हटके व्हिडियो

By  
on  

बॉटल कॅप चॅलेंजचा फिव्हर आता सोशल मिडियावर वा-यासारखाच पसरला आहे. जो तो हे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. सेलिब्रिटीही हे चॅलेंज स्विकारायला अजिबात मागे पुढे पाहात नाहीत. नुकतंच ‘विठूमाऊली’ मालिकेतील विठ्ठल यांना देखील हे चॅलेज स्विकारण्याचा मोह आवरला नाही.

 

पण विठ्ठल यांनी चॅलेंज मात्र हटके पद्धतीने पूर्ण केलं आहे. विठूमाऊलीच्या भूमिकेत असलेले अजिंक्य राऊत यांनी बाटलीचं झाकण काढलं खरं पण खास विठूमाऊलींच्या स्टाईलने. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Ae Dhakkan #BottleCapChallenge #SaveWater #EveryDropCounts

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27) on

 

यामध्ये दुसरा व्हिडियो आहे तो श्रेयस तळपदेचा. मराठीतील या हॅण्डसम हिरोने चॅलेंज पूर्ण करायची तयारी केली पण पूर्ण करण्याऐअवजी पाणी वाचवा असा मोलाचा संदेश दिला. मराठी सिनेसृष्टीतील एनर्जीमॅन सिद्धार्थ जाधवने देखील हे चॅलेंज पूर्ण केलं आहे. सिद्धार्थने रिकाम्या बॉटलसोबत पूर्ण हे चॅलेंज व्हिडियो शेअर केला आहे.

 

आता यांच्याप्रमाणेच आणखी कोण कोण हे चॅलेंज पूर्ण करतंय ते पाहूच.

Recommended

Loading...
Share