अभिनेत्री सायली संजीव घेतेय 'यू टर्न'? जाणुन घ्या काय आहे प्रकरण

By  
on  

'काहे दिया परदेस' मालिकेतून सायली संजीव हे नाव घराघरात पोहोचलं. लवकरच सायली संजीव आगामी मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'यू टर्न' असं तिच्या आगामी सिनेमाचं नाव असून या सिनेमाचं हटके पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पोस्टरमध्ये दोन व्यक्तींच्या हातात दोन सुटकेस असून दोघेही विरुद्ध दिशेला जात आहेत. 

 

हा सिनेमा येत्या पावसाळ्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात सायली संजीव सोबत आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. लवकरच या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. 

 

Recommended

Loading...
Share