अरेच्या हे काय झालं! दोन्ही शनाया आल्या एकमेकांसमोर

By  
on  

'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील गॅरी आणि राधिका सुभेदार ही दोन पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. गॅरी आणि राधिकाशिवाय या मालिकेतील आणखी एक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे ती म्हणजे शनाया. सतत राधिका आणि गुरूच्या संसार उध्वस्त करण्याच्या प्रयत्नात असलेली शनाया तिच्या लाडिक आणि अवखळ अंदाजामुळे भाव खाऊन गेली.

शनाया ही व्यक्तिरेखा आधी अभिनेत्री रसिका सुनील साकारायची. परंतु परदेशात जाण्याच्या कारणास्तव तिने रसिकाने या मालिकेला रामराम ठोकला. त्यानंतर अभिनेत्री इशा केसकरने शनाया साकारण्याची धुरा लीलया पेलली. आता रंजक बाब म्हणजे या दोन्ही शनाया 'गर्लफ्रेंड' सिनेमात एकत्र झळकत आहेत. या सिनेमाच्या ट्रेलर लाँच वेळी या दोघी एकत्र येण्याचा योग जुळून आल्या. 

इशा आणि रसिका या प्रमोशनमध्ये गप्पांमध्ये रंगून गेल्या होत्या. या दोन्ही अभिनेत्री 'गर्लफ्रेंड'मध्ये एकत्र काम करत आहेत. या दोघी प्रत्यक्ष आयुष्यात अत्यंत चांगल्या मैत्रिणी आहेत. या दोघी नेहमीच एकमेकांच्या कामाचं कौतुक करत असतात. त्यांच्यातलं बाँडिंग नेहमीच प्रेक्षकांना पाहायला मिळतं. 

या इव्हेंटमध्ये प्रमोशनमधून जसा वेळ मिळेल तशा या दोघी एकमेकांशी गप्पा मारत होत्या. आता या नेमक्या कोणत्या गप्पा मारत असतील? त्यांच्यात कोणती चर्चा घडली असेल? हे त्यांनाच ठाऊक. 'गर्लफ्रेंड' २६ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातून अमेय-सई ही फ्रेश जोडी झळकणार आहे. 

Recommended

Loading...
Share