अभिनेत्री पल्लवी जोशीला पडला १२ हजारांचा गंडा, जाणून घ्या प्रकरण

By  
on  

आजवर मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे. नुकतंच मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत कार्यरत असणारी अभिनेत्री आणि लोकप्रिय सूत्रसंचालिका पल्लवी जोशीला अशाच फसवणुकीला सामोरे जावे लागले. 

अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरून त्याआधारे त्यांच्या कार्डच्या साहाय्याने १२ हजार रुपये चोरट्यांनी लुटल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पल्लवी जोशी यांनी वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विशेष बाब म्हणजे चोरट्यांनी युरो चलनाचा वापर करून हा व्यवहार केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जुलै रोजी ही घटना घडली. त्यादिवशी पल्लवी जोशी वापरत असलेले क्रेडिट कार्ड त्यांच्याच ताब्यात होते.

एका आघाडीच्या वृत्तपत्राशी बोलताना पल्लवी म्हणाल्या, ''मला त्या दिवशी पाच ते सहा एसएमएस अलर्ट आले. माझ्या क्रेडिट कार्डच्या माहितीच्या साह्याने चोरट्यांनी युरोमध्ये व्यवहार केले होते. मी लगेचच माझ्या बँकेला या व्यवहारांबद्दल माहिती दिली आणि माझे क्रेडिट कार्ड ब्लॉक केले. त्यांच्या क्रेडिट कार्डवरून १२ हजार रुपयांचे व्यवहार करण्यात आले होते.''

प्राथमिक तपासानुसार असे लक्षात आले की चोरट्यांनी युरोपमध्ये टॅक्सी प्रवासासाठी पल्लवी जोशी यांच्या क्रेडिट कार्डचा वापर केला. 

Recommended

Loading...
Share