By  
on  

प्रार्थना बेहरेही वेबप्लॅटफॉर्मवर? पती अभिषेक करणार निर्मिती

लोभस चेह-याच्या अभिनेत्रींमध्ये प्रार्थना बेहरेचं नाव आवर्जुन घ्यावं लागेल. अनेक उत्तम सिनेमांमधून तिने अभिनयाची छाप सोडली आहे. तिच्या आगामी सिनेमाविषयी चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. पण यावेळी प्रार्थना सिनेमातून नाही तर वेबसिरीजमधून चाहत्यांसमोर येण्याची शक्यता आहे. प्रार्थनाचा नवरा अभिषेक नव्या सिनेमा आणि वेबसिरीजच्या निर्मितीचा विचार करत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

If you want to find happiness...find Gratitude ... #happyme #ilovemygod #gratefulforlife

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

या वेबसिरीजमध्ये प्रार्थना असेल तर ही तिची पहिलंच वेबप्रोजेक्ट असणार आहे. प्रार्थनाने आतापर्यंत मितवा, मिस्टर आणि मिसेस सदाचारी, रेडीमिक्स,कॉफी आणि बरंच काही या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपुर्वीच ती ‘ती & ती’ सिनेमात दिसली होती. यात तिच्यासोबत पुष्कर जोग आणि सोनाली कुलकर्णी देखील होते. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिने  मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं. आता वेबप्लॅटफॉर्मवर कधी येते याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे

Recommended

PeepingMoon Exclusive