By  
on  

सायली संजीव आणि ओमप्रकाश दिसणार वेबसिरीजमध्ये, मोशन पोस्टर रिलीज

काहे दिया परदेस आणि खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून ओळख बनवलेले सायली संजीव आणि ओमप्रकाश शिंदे वेबप्लॅटफॉर्मवर एकत्र येत आहेत. ‘यु टर्न’ नावाच्या वेबसिरीजमधून हे दोघे रसिकांच्या भेटीला येत आहेत. दोघांचीही ही पहिलीच वेबसिरीज आहे. सायलीला ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील गौरीच्या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्धी मिळाली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मालिका आणि चित्रपटात तुम्ही मला बघितलत... खूप प्रेम दिलंत... आता माझी वेब सिरीज येत आहे... त्याला देखील तुम्ही भरभरून प्रेम द्याल ह्याची खात्री आहे... सादर आहे मोशन पोस्टर... राजश्री मराठी presents “U Turn” Produced by: Neha Barjatya Lyrics, Music, Written and Directed By: Mayuresh Joshi #UTurn #UTurnWebSeries #RajshriMarathiOriginals #RajshriMarathi #MarathiWebSeries @rajshrimarathi @sayali_sanjeev_official @omprakash_shinde @mayuresh.joshi

A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official) on

 

त्यानंतर ती ‘परफेक्ट पती’ या हिंदी मालिकेतही झळकली होती. ओमप्रकाशला ‘खुलता कळी खुलेना’मधील डॉ. विक्रांतच्या व्यक्तिरेखेमुळे ओळख मिळाली. ओमप्रकाशने यानंतर ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत मल्हारची व्यक्तीरेखा साकारली. या दोघांची ही वेबसिरीज रोमॅंटिक असणार असं मोशन पोस्टरवरून समोर येत आहे. सायली आणि ओमप्रकाशने सोशल मिडियावर ही बाब शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘मालिका आणि चित्रपटात तुम्ही मला बघितलत... खूप प्रेम दिलंत... आता माझी वेब सिरीज येत आहे... त्याला देखील तुम्ही भरभरून प्रेम द्याल ह्याची खात्री आहे... आता सायली आणि ओमप्रकाश यांची वेबकेमिस्ट्री लोकांना किती आवडते ते लवकरच कळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive