By  
on  

सुबोध म्हणतो,'गुगलने शोधलं असतं तरी सापडली नसती मंजिरी'

असं म्हणतात, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. सुबोध भावेकडे पाहता त्याची प्रचिती नक्कीच येते. वैयक्तिक आणि प्रोफेशन आयुष्यात मंजिरीने सुबोधला खंबीर साथ दिली आहे. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. सुबोधनेही खास अंदाजात मंजिरीला विश केलं आहे.

 

यावेळी शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘गूगल नी शोधलं असतं तरी त्यांना तू सापडली नसतीस...पण माझ्या चाणाक्ष डोळ्यांनी तुला शोधलं.... लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मंजिरी. आणि आम्हा दोघांना शुभेच्छा देणाऱ्या तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार.’

सुबोध सध्या ‘अश्रुंची झाली फुले’ या नाटकांच्या प्रयोगात व्यस्त आहे. याशिवाय ‘तुला पाहते रे’ मालिकाही आता शेवटच्या टप्प्यात आहे.

यातील विक्रांतच्या व्यक्तिरेखेला रसिकांनीही खुप प्रेम दिलं. याशिवाय तो सुभाष घईंच्या मुक्ता आर्ट्ससोबत एका सिनेमात झळकणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive