नचिकेतच्या ‘गर्लफ्रेंड’ला नक्की कशाचं कोडं पडलं आहे? पाहा तुम्हीच

By  
on  

सध्या सगळीकडे चर्चा आहे नचिकेतच्या ‘गर्लफ्रेंड’ची. अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्या गर्लफ्रेंड सिनेमातील नच्याला म्हणजेच अमेयला गर्लफ्रेंड नसणं हा जणू कळीचा मुद्दा बनला आहे. पण विशेष गोष्ट अशी की नच्याला गर्लफ्रेंड मिळाली खरी पण प्रेमाची गाडी अजूनही धक्के खाताना दिसत आहे. यावर आधारलेलं सिनेमातील नवं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. ‘कोडे थोडे सोपे थोडे अवघड’ अशी सुरुवात असलेल्या गाण्यात अमेय आणि गर्लफ्रेंडची कुलेस्ट केमिस्ट्री दिसून येत आहे. यामध्ये नच्या आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या नात्यातील अनेक कडू गोड प्रसंग पहायला मिळतात.

 

या गाण्याला हृषिकेश-सौरभ-जसराज यांचं संगीत लाभलं आहे. तर हे गाणं क्षितिज पटवर्धन याने लिहिलं आहे. श्रुती आठवलेने हे गाणं गायलं आहे. या गाण्यात नच्याला गर्लफ्रेंड मिळाली आहे खरी, पण यात ती केवळ त्याच्यासोबतच दिसत आहे. म्हणजे नच्याची ही गर्लफ्रेंड आभासी आहे की तिस-या जगातून आलेली आहे हे समजायला मार्ग नाही. पण काहीही असो अमेय सईची ही केमिस्ट्री अनेकांना आवडत आहे. नच्या आणि त्याच्या गर्लफ्रेंडची हटके केमिस्ट्री 26 जुलैला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share