By  
on  

Birthday Special: 'बिग बॉस मराठी'मुळे या अभिनेत्याच्या करियरला मिळाली नवी सुवर्णझळाळी

स्ट्रगलमधून सर्वांना जावं लागतं. परंतु संयमाने या स्ट्रगलला सामोरं जाऊन स्वतःचं करियर यशस्वी करणारे फार कमी असतात. पुष्कर जोगच्या आयुष्यात सुद्धा स्ट्रगल खूप आला. परंतु कठीण काळामध्ये संयम ठेऊन पुष्करला बिग बॉस मराठीच्या रूपातून करियरची नवी कवाडं उघडी झाली. आणि बिग बॉसच्यामुळे पुष्करच्या करियरची रखडलेली गाडी पुन्हा रुळावर आली. 

 

अभिनेता पुष्कर जोग मूळचा पुण्याचा आहे. पुष्करचा जन्म १५ जुलै, १९८५ चा. पुष्करचे बालपण पुण्यातच गेले. बालकलाकार ते मराठी अभिनेता म्हणून पुष्करने नाव कमावले. 

पुष्करने बालकलाकार म्हणून मराठी तसेच हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. पुष्करने 'वाजवू का?', 'सुन लाडकी सासरची', 'साखरपुडा', 'रावसाहेब' या मराठी तर 'हम दोनो', 'ऐसी भी क्या जल्दी है', 'आझमाईश' या हिंदी सिनेमांत बालकलाकाराची भूमिका केली आहे. लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या पुष्करला खासकरून मराठी सिनेमांमधून खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. 

महेश कोठारेंच्या 'जबरदस्त' या सिनेमातून पुष्कर जोगने प्रमुख भूमिका करून तमाम मराठी सिनेसृष्टीचं लक्ष स्वतःकडे वळवून घेतले. 

पुष्करने विद्या भवन आणि जे. बी. जोग कॉलेजमधून स्वतःचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. 

वयाच्या चौथ्या वर्षापासून पुष्करने अभिनयास सुरुवात केली होती. पुष्करला महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे. अभिनयासोबत पुष्कर पेशाने डेंटिस्ट सुद्धा आहे. पुष्करची डेंटिस्ट म्हणून असलेली ओळख फार कमी लोकांना माहित आहे. 

पुष्करने २०१८ साली आलेल्या बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिजनमध्ये भाग घेतला. स्वतःच्या हुशारीने पुष्कर पहिल्या सिजनचा उपविजेता झाला होता. 

पुष्करने या वर्षी 'ती & ती' या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. पुष्कर सध्या यूट्युब वर 'बिग बॉस मराठी 2' विषयी 'एक घर बारा भानगडी' हा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. पुष्करच्या हा कार्यक्रम यूट्युब वर लोकप्रिय आहे. अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्वास पिपिंगमुन मराठीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Recommended

PeepingMoon Exclusive