निखळ हास्याचा झरा असलेल्या अभिनेत्री स्पृहा जोशीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का?

By  
on  

सध्या ऑफ शोल्डर गाऊन पार्टी किंवा इतर कार्यक्रमात स्टाईल स्टेट्मेंट असताना स्पृहा जोशीची स्टाईल मात्र हटके आहे. स्पृहा सो कॉल्ड स्टायलिश नसली तरी तिचा ड्रेस सेन्स मात्र उत्तम आहे. याचीच प्रचिती तिच्या अलीकडच्या फोटोंमधून येत असते.

 

स्पृहा जोशी आणि साडी हे समीकरण आता घट्ट बनलं आहे. स्पृहाचे साडीमधील लूक्स तिला अधिकच स्पेशल बनवतात. स्पृहाने अलीकडेच अमेरिकेत एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

 

. त्यावेळी साडीमधील लूकने तिला परफेक्ट स्टाईल दिवा बनवलं होतं. स्पृहा सध्या संजय दत्त प्रॉडक्शनच्या ‘बाबा’ या सिनेमात दिसणार आहे. यात ती अभिजीत खांडकेकरसोबत झळकणार आहे.

 

या सिनेमात तिच्यासोबत दीपक डोब्रियाल, नंदिता धुरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा रसिकांच्या भेटीला 2 ऑगस्टला येणार आहे.

 

Recommended

Loading...
Share