विक्रम फडणीस यांच्या ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचं स्क्रिनिंग झोकात

By  
on  

विक्रम फडणीस यांच्या बहुचर्चित ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचं स्क्रिनिंग पार पडलं.

 

यावेळी अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

 

या सिनेमात  मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर, प्रसाद ओक, आदिती गोवित्रीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

फॅशन डिझायनर आणि आता दिग्दर्शक असलेल्या विक्रम यांचा हा दुसरा मराठी सिनेमा आहे.

 

२०१७ साली 'हृदयांतर' या सिनेमातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

 

यापुर्वी ते फॅशन डिझायनर म्हणून कार्यरत होते. या सिनेमात हृतिक रोशन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला होता.

 

स्माईल प्लीजमध्ये जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा संदेश दिला गेला आहे.

 

या सिनेमात मुक्ता एक फॅशन फोटोग्राफरचा रोल करत आहे. यात तिच्या आयुष्यात घडणा-या घडामोडींवर हा सिनेमा आधारलेला आहे.

 

आदिती गोवित्रीकरचा या सिनेमात खास रोल आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का हे लवकरच कळेल.

Recommended

Loading...
Share