अभिनेता पुष्कर जोग आणि पत्नी जस्मिनमध्ये सईमुळे आला दुरावा?

By  
on  

मराठी बिग बॉसच्या घरातील सदस्यांमध्ये विशिष्ट काळापर्यंत एकत्र राहिल्यानंतर बॉडिंग होणं सहाजिक असतं. या शोच्या पहिल्या सीझनमध्ये अनेक नाती बनली. त्यातील एका जोडीचं नाव मात्र कायम चर्चेत असतं ते म्हणजे सई आणि पुष्कर जोग. बिग बॉसच्या घरात असताना या दोघांमधील मैत्री चर्चेचा विषय होतीच. पण आताही ही मैत्री चर्चेचा विषय आहे.

 

पण या मैत्रीमुळे पुष्कर आणि त्याची पत्नी जस्मिन यांचं नातं मात्र धोक्यात आल्याची चर्चा सध्या सोशल मिडियावर आहे. जस्मिनने पुष्करला सोशल मिडियावर अनफॉलो केलं आहे.याशिवाय जस्मीनने त्याच्यासोबतचे सगळे फोटोही सोशल मिडियावरून डिलीट करून टाकले आहेत.

 

याशिवाय पुष्करच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्येही जस्मिन कुठेच दिसत नव्हती. त्यामुळे हे दोघे वेगळे होणार का? अशी चर्चा होत असतानाच पुष्करने यावर खुलासा केला आहे. तो म्हणतो, ‘या सगळ्या अफवा आहेत. आम्ही सोशल मिडियावर जरी कनेक्ट नसलो तरी कुटुंब म्हणून कायमच एकत्र आहोत. त्यामुळे लोकांनी कोणत्याही अफवा पसरवू नयेत’ असंही त्यानं सांगितलं आहे. या सगळ्या प्रकरणावर सईची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही.

 

 

Recommended

Loading...
Share