नाट्यगृहातील एसी बंद केल्याप्रकरणी अभिनेता भरत जाधवने व्यक्त केला राग

By  
on  

मराठी नाटकांना नवे दिवस प्राप्त झाले आहेत याची सगळीकडे चर्चा होते. परंतु नाट्यगृहाची दुरावस्था मात्र कलाकारांसाठी चिंतेची आणि संतापजनक बाब आहे. खूपदा नाट्यगृहांमधील भोंगळ आणि अनागोंदी कारभाराचा फटका कलाकारांना बसलेला दिसून येतो. असाच अनुभव अभिनेता भरत जाधवला नुकताच आला. 

ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये भरत जाधव यांच्या नाटकाचा प्रयोग होता. यावेळेस प्रयोग चालू असताना नाट्यगृहात एसी बंद ठेवण्यात आला. त्यामुळे भरत जाधवसह नाटकातील इतर कलाकारांना अक्षरशः घुसमट सहन करावी लागली. 

भरत जाधव यांनी ही बाब नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष करून उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे भरत जाधव यांनी आपली खंत व्हिडिओद्वारे व्यक्त करत  रसिकप्रेक्षकांशी संवाद साधला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.

 

या व्हिडिओमध्ये भरत जाधव घामाने पूर्ण भिजलेले पाहायला मिळत आहेत. भरत जाधव यांना याआधीही २-३ वेळा असा अनुभव आला आहे. या व्हिडिओखाली भरत जाधव यांच्या चाहत्यांच्या आणि नाट्यरसिकांच्या नाट्यगृहातील मनमानी कारभाराविषयी तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत. 

या प्रकरणानंतर आता तरी नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांना जाग येणार का? हा सर्वांना प्रश्न पडला आहे. 

Recommended

Loading...
Share