By  
on  

चेटकीणीची भीती दाखवून वैभव मांगले आता या नव्या भूमिकेत, वाचा सविस्तर

अभिनेता वैभव मांगले आपल्याला अनेक भूमिकांमधून भेटला आहे. पण आता वैभव पूर्णतया वेगळ्या भूमिकेत असणार आहे ते म्हणजे परिक्षकाच्या. झी युवावरील एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये तो परिक्षक बनणार आहे. ‘युवा सिंगर, एक नंबर’ असं नाव असलेल्या संगीत रिअ‍ॅलिटी शोचा प्रोमो वाहिनीने नुकताच रिलीज केला.

 

यात वैभव जजच्या खुर्चीवर बसलेला दिसतो. त्याच्यासमोर बेसूर गाणा-या मुलाला शांत बसायला सांगतो. वैभव ‘सूर निरागस हो’ गायला सुरु करतो तेव्हा आपल्या तोंडून आपोआपच वा ! असे उद्गार निघतात. वाहिनीने संगीतातला "सा" दम असेल तरच लावा, कारण चान्स एकदाच मिळतो. "युवा सिंगर एक नंबर" 7 ऑगस्टपासून या कॅप्शनखाली हा व्हिडियो शेअर केला आहे.

हा कार्यक्रम 7 ऑगस्टपासून बुधवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता झी युवावर सुरु होत आहे. वैभव सध्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकात चिंची चेटकीण साकारताना दिसत आहे. या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये हे नाटक विशेष लोकप्रिय आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive