By  
on  

सई ताम्हणकरने आपल्या रिलेशनशिपबद्दल केला हा खुलासा

सई ताम्हणकर ही मराठी तसेच हिंदी इंडस्ट्रीमधील एक चतुरस्त्र अभिनेत्री. सई ताम्हणकर नेहमी सिनेमातल्या तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे चर्चेत असते. परंतु सध्या सई एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. एका आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सईने आपल्या रिलेशनशिपबद्दल मोकळेपणाने खुलासा केला. 

सईचं नाव सध्या घनश्याम लालसा सोबत जोडलं जात आहे. याविषयी प्रथमच सईने मोकळेपणाने या मुलाखतीत वक्त्यव्य केले. सई म्हणाली,''आमची रिलेशनशिप बुचकळ्यात टाकणारी आहे. आणि आमच्या दोघांमधलं हेच नातं पुढचे काही वर्ष असंच असेल.'' 

सईचा घटस्फोट होऊन अनेक वर्ष झाली आहेत. घटस्फोट झाल्यानंतर सईचं नाव घनश्याम सोबत जोडलं गेलं. परंतु सईने कधीच आपल्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितलं नाही. आता सई आणि घनश्याम यांच्या नात्याबद्दल खरं काय ते सईलाच माहीत. सई लवकरच 'गर्लफ्रेंड' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच'मिडीयम स्पायसी'या आगामी मराठी सिनेमात सुद्धा सई झळकणार आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive