By  
on  

बिग बॉस मराठी 2: घरातून बाहेर पडल्यानंतरही वैशाली म्हाडेला आहे ही खदखद

बिग बॉसच्या घरातून नुकतीच महागायिका वैशाली म्हाडे बाहेर पडली. त्यानंतर आज पहिल्यांदाच तिने माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यात तिने अनेक आठवणी शेअर केल्या. घरातील आतापर्यंतच्या वास्तव्यात पराग कान्हेरेसाठी तिच्या मनात असलेली खदखद तिने स्पष्ट केली. परागला कधीही माफ करू शकणार नसल्याचंही तिने स्पष्ट केलं.

वैशालीच्या मुलीचा नुकताच वाढ्दिवस झाला. पण यावेळी वैशाली तिच्यासोबत नव्हती. पण यादिवसापासून तिला घराबाहेर जाण्याची इच्छा वाटू लागल्याचंही तिने स्पष्ट केलं. बिग बॉसच्या घरात विजेतेपदाचा दावेदार कोण आहे असं विचारल्यावर तिने शिव आणि खास मित्र अभिजीत केळकरचंही नाव घेतलं. वैशालीला घरातील एक आठवण मात्र अजूनही सतावते आहे. ती म्हणजे सकाळी उठल्यावर डान्सची. घरी आल्यावरही वैशाली सकाळी उठल्यावर डान्ससाठी हात वर केला आणि तिच्या लक्षात आलं की ती घरी आहे. वैशालीसाठी हा प्रवास अनेक अनुभवांनी सजलेला होता हेच खरं!

Recommended

PeepingMoon Exclusive