ईशा फेम अभिनेत्री गायत्री दातारला आला चक्क महिलेकडून अश्लील मेसेज

By  
on  

कलाकारांना फॅन्समुळे अनेकदा मनस्तापाचा सामना करावा लागतो. सोशल मिडियावरील ट्रोलिंगला देखील सामोरं जावं लागतं. ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री गायत्री दातारलाही अशा प्रकाराला सामोरं जावं लागलं. एका महिलेने गायत्रीच्या फेसबूक अकाउंटवर अश्लील मेसेज पोस्ट केला आहे.

 

गायत्रीने याबद्दल नुकतंच इन्स्टास्टोरी अपडेट केली होती. या स्टोरीसोबतच्या कॅप्शनमध्ये गायत्री म्हणते, ‘हे असं बोलणं योग्य आहे का? या व्यक्तीचं सोशल मिडिया अकउंट आहे. आपण सगळ्यांनी त्याविरोधात आवाज उठवून ताकद दाखवून दिली पाहिजे.’

 

गायत्रीला मेसेज ज्या अकाउंटवरून आला होता ते अकाउंट खरंच एका महिलेचं आहे की फेक आहे हे समजू शकलेलं नाही. यापूर्वी अभिनेत्री केतकी चितळेलाही अशाच प्रकारे सोशल मिडियावर ट्रोल केलं गेलं होतं. त्यावेळी केतकीने खंबीर पाऊल उचलत ट्रोलर्सना धडा शिकवला होता.

Recommended

Loading...
Share