By  
on  

पराग कान्हेरे परततोय, पण बिग बॉसच्या घरात नाही तर.......

बिग बॉसच्या घरातील सदस्यांना मारहाण केल्यामुळे परागला 'बिग बॉस मराठी 2' मधून परागला निलंबित करण्यात आलं होतं. परंतु परागने काही दिवसांपूर्वी 'मी परततोय, आता सर्वांचा हिशेब चुकता होणार' अशी पोस्ट टाकली होती. त्यावरून पराग पुन्हा बिग बॉसच्या घरात परतणार अशी सर्वत्र चर्चा होती. 

नुकतंच परागने एक पोस्ट टाकून त्याच्या आगामी प्रोजेक्टचा खुलासा केला. यावरून पराग पुन्हा बिग बॉसच्या घरात परतणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. शेफ पराग कान्हेरे लवकरच 'कुक विथ पराग कान्हेरे' ही कुकिंग सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. पराग 'किचनसुत्र' या चॅनलवर ही सिरीज घेऊन येणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मी येणार... सगळ्यांबद्दल बोलणार... असं काही दिवसांपूर्वी मी पोस्ट केलं आणि त्याचा सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने अर्थ लावला... असो... मी येणार म्हणता म्हणता तो दिवस येऊन ठेपलाय... मी येतोय माझ्या किचनसूत्रा या चॅनेलवर एक अनोखी सिरीज घेऊन... हॅशटॅग कूक विथ पराग कान्हेरे... थोड्याच वेळात पहिला एपिसोड तुमच्या भेटीला येईल... प्यार की खिचडी.... O U R T E A M DOP @angad.joshi.photography Publicity Stills @kshots.rkp Asst dop and BTS @photographer_pranil Co- anchor @rjkedar Location @thefarmstead.pune Directed by @nachiketkhasnis #iwilltalk #newshow #goodfood #goodfoodgoodmood #kitchensutraa #youtube #webseries #firstepisode #new #friday #memories #cookwithparagkanhere #beingchef #teamwork #isupportparag #roarwithparag #bringbackparag #stories #honesty #beinghonest #rupalibhosale #bbm2 #bigbossmarathi

A post shared by Chef Parag Kanhere (@paragkanhere) on

बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर परागची नवी इनींग सुरु होणार आहे. आता प्रेक्षक परागच्या या सीरिजला कसा प्रतिसाद देतात, हा कुतूहलाचा विषय आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive