By  
on  

मराठी टीव्ही आणि सिनेक्षेत्रातील लोकप्रिय अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे निधन

सहाय्यक भूमिकांमधूनही स्वतःच्या अभिनयाची छाप पडणारे चतुरस्त्र अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे आज निधन झाले. श्रीराम कोल्हटकरांनी मराठी टीव्ही तसेच सिनेमाक्षेत्रात स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला. 

मराठी सिनेमांसोबतच श्रीराम कोल्हटकरांनी अनेक हिंदी सिनेमामधून सुद्धा अभिनय केला आहे. 'आपला माणूस', 'एक अलबेला', 'करले तू भी मोहब्बत', 'अ डॉट कॉम मॉम', 'उंच भरारी' आदी सिनेमात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत नुकतंच श्रीराम कोल्हटकर झळकले होते. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि  हिंदी सिनेसृष्टीतील त्यांचे सहकलाकार आणि त्यांचे चाहते  शोकाकूल झाले आहेत. 

Recommended

PeepingMoon Exclusive