By  
on  

मिसेस मुख्यमंत्रींनी लावलाय 'कबीर सिंग'च्या गाण्याचा सुर

मागील महिन्यात देशात चर्चा होती ती केवळ ‘कबीर सिंग’ची. या सिनेमाने आतापर्यंत उत्तम बिझनेस केला. विशेष म्हणजे या सिनेमातील गाणीही खुप लोकप्रिय आहेत. त्यापैकी ‘तेरी बन जाऊंगी’  गाण्याचा फिमेल व्हर्जन नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘तेरा बन जाऊंगा’ या मूळ गाण्याचं ते फीमेल वर्जन आहे.

या गाण्याला मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी आवाज दिला आहे. त्यांच्या आवाजातील या गाण्याला युट्युबवर लाईक्स मिळत आहेत. अमृता फडणवीस या अलीकडेच एका फॅशन शोच्या शो स्टॉपरही बनल्या होत्या. नोकरी आणि कुटुंब सांभाळूनही त्या सामाजिक जीवनात ब-यापैकी अ‍ॅक्टीव्ह असतात. अमृता यांचा यापूर्वीही एक अल्बम रिलीज झाला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive